Ladki Bahin Yojana: अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरचे १५०० रुपये ‘या’ दिवशी जमा होणार; संक्रांतीला मिळणार डबल गिफ्ट?

Ladki Bahin Yojana: अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरचे १५०० रुपये ‘या’ दिवशी जमा होणार; संक्रांतीला मिळणार डबल गिफ्ट? : लाडकी बहीण योजना अपडेट: लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या मेसेजची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. “नोव्हेंबरचे पैसे कधी येणार?” या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिले आहे. ​

तुम्हाला १५०० रुपये मिळणार की थेट ४५००? आणि संक्रांतीसाठी सरकारचं काय मोठं प्लॅनिंग आहे? हे सर्व आपण आजच्या या बातमीत सविस्तर जाणून घेणार आहोत.

नोव्हेंबर हप्ता: १५०० की ४५००? कन्फ्युजन दूर!

अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्रित ४५०० रुपये मिळतील. पण थांबा! सरकारची रणनीती आता स्पष्ट झाली आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित १५०० रुपयांचा हप्ता याच आठवड्यात (डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात) तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ​

८ डिसेंबर रोजीच शासनाने २६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे (GR निर्गमित झाला आहे), त्यामुळे निधीची कमतरता नाही. आज सोमवार आहे, त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलची रिंग वाजू शकते!

संक्रांतीला सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’! (डबल धमाका)

आता तुम्ही विचार कराल की, मग डिसेंबर आणि जानेवारीच्या पैशांचं काय? तर इथेच खरी आनंदाची बातमी आहे. ​येत्या जानेवारीत महिलांचा आवडता सण ‘मकर संक्रांत’ येत आहे.

लाडक्या बहिणींना संक्रांतीची ओवाळणी देण्यासाठी सरकार डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्रित (३००० रुपये) देण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच, आता १५०० रुपये मिळतील आणि जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात थेट ३००० रुपये खात्यात जमा होऊ शकतात.

×

Leave a Comment