Ladki Bahin Yojana : अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट मिळाली असून, हा हप्ता 13 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी किंवा 20 फेब्रुवारी या तीनपैकी एखाद्या तारखेला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हप्ता किती मिळणार?
ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत, त्यांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये थेट खात्यात जमा होतील.
मात्र, ज्या महिलांचे हप्ते ई-केवायसीतील चूक किंवा अपूर्णतेमुळे थांबले होते, आणि आता ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण होऊन त्या पात्र ठरतील, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी – असे तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
4500 रुपये एकत्र का दिले जाणार?
जून महिन्यात सुरू झालेल्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांचे पुढील हप्ते सुरू झाले होते, मात्र मागील दोन-तीन महिन्यांचे थकीत पैसे त्यांना मिळाले नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
या अनुभवातून सरकारने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की,
➡️ पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिला पात्र ठरल्यास तिचा संपूर्ण प्रलंबित लाभ दिला जाईल.
याच कारणामुळे आता काही लाभार्थींना 4500 रुपये एकत्र देण्याचा निर्णय घेतला जात आहे.
पुढे काय बदल होणार?
सरकारचा विचार आहे की मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या वितरणात अधिक शिस्त आणली जाईल.
म्हणजे दर महिन्याचा हप्ता ठराविक कालावधीतच जमा केला जाईल –
उदा. 1 ते 5, 5 ते 10 किंवा 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, जेणेकरून महिलांना आर्थिक नियोजन करता येईल.



