आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये? सरकार देणार?|Ladki Bahin Yojana Double Payment Gift

Ladki Bahin Yojana Double Payment Gift: सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हप्ता का रखडला? पैसे कधी येणार? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. पण आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.

हा विलंब कदाचित तुमच्या पथ्यावर पडू शकतो, कारण सरकार लाडक्या बहिणींना Double Payment Gift देण्याच्या विचारात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल ३००० रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात.

निवडणुकीच्या तोंडावर 'बंपर' धमाका? नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे सोबतच येणार?

सध्या महिलांचा संयम सुटत चालला आहे. "नोव्हेंबर गेला, डिसेंबर अर्धा झाला तरी पैसे नाही, मग योजना बंद करा," असा संतप्त सवाल काही बहिणी विचारत आहेत. मात्र, सरकारने हा हप्ता विनाकारण लांबवलेला नाही, त्यामागे एक मोठं गणित असू शकतं. राज्यात लवकरच २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. १५ जानेवारीच्या सुमारास या निवडणुका होऊ शकतात.

विधानसभेला ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी "गेम चेंज" केला आणि महायुतीला सत्तेत आणलं, तसेच चित्र महानगरपालिका निवडणुकीत दिसावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी सरकार हे Double Payment Gift देण्याची रणनीती आखत आहे.

लाडकी बहीण ठरणार 'गेम चेंजर

तुम्ही पाहिलं असेलच की, विधानसभेच्या वेळी १५०० रुपये खात्यात आल्यावर वातावरण कसं बदललं होतं. आताही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये निवडणुका आहेत. शहरी भागात महिला मतदारांची संख्या मोठी आहे (जवळपास ४७-४८%). जर यावेळी पैसे वेळेत मिळाले नाहीत, तर लाडक्या बहिणी नाराज होऊ शकतात आणि त्याचा फटका सरकारला बसू शकतो. ही जोखीम पत्करून सरकारला चालणार नाही. त्यामुळेच मतदानाच्या आधी एक ठोस तारखेला हे Double Payment Gift देऊन सरकार डॅमेज कंट्रोल करू शकते.

२१०० रुपये की ३००० रुपये? नेमकं काय मिळणार?

अनेक बहिणींना वाटत होतं की महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हप्ता वाढवून २१०० रुपये केला जाईल. पण सध्या सरकारकडे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झालेली नाही आणि सुधारित याद्या तयार नाहीत. त्यामुळे २१०० रुपयांचा निर्णय थोडा लांबणीवर पडू शकतो.

पण, हक्काचे १५०० रुपये तर फिक्स आहेत! त्यामुळे नोव्हेंबरचे १५०० आणि डिसेंबरचे १५०० असे एकूण ३००० रुपये एकाच वेळी जमा करून सरकार महिलांना मोठा दिलासा देऊ शकते. हे Double Payment Gift मिळाल्यास महिलांचा आनंद द्विगुणित होईल आणि त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana Double Payment Gift सरकारचा मास्टरस्ट्रोक

थोडक्यात सांगायचं तर, नोव्हेंबरचा हप्ता लांबला असला तरी तो वाया गेलेला नाही. येत्या आठवडाभरात किंवा डिसेंबरच्या अखेरीस दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच क्लिकवर जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे Double Payment Gift म्हणजे सरकारचा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो.

तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? सरकारने दर महिन्याला १५०० द्यावेत की दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकत्र द्यावेत? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment